गुन्हेगारीपुणे

NEET पेपरफुटीचं कनेक्शन उघड पुणे ! मनीषा वाघमारेसह आणखी एकाला CBIची अटक

NEET पेपरफुटी प्रकरणात CBIने मनीषा वाघमारे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन पेपरफुटी आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मनीषा वाघमारे हिला सीबीआयने ताब्यात घेतलं होत. तिची दिवसभर चौकशी करण्यात आली आणि त्या नंतर सीबीआयने ताब्यात घेवून अटक केली आहे. तिच्या घरातून लैपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आल. मात्र तिच्या एका चैनलवर विद्यार्थीना पेपर फुटीच्या आरोपींपर्यंत पोहोचवण्याच कनेक्शनच उघड झाल आहे. या प्रकरणात मनीषा वाघमारे हिचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाला आहे. तिला सीबीआयने अटक केली आहे. तिची पुढील चौकशी केली जात आहे. मात्र आता आणखी एक कनेक्शन यामध्ये समोर आल आहे. आणखी एकाला पुण्यातून या संदर्भात अटक करण्यात आली आहे.मनीषा वाघमारे हिच्या पतीच पुण्यात एक मोठ हॉस्पिटल आहे. दातांचा दवाखाना आहे. मनीषा वाघमारे ही ब्यूटी पार्लरच काम करते आणि ती विद्यार्थांना जोडून देण्याच काम करत होती. एका विद्यार्थ्यांकडून जवळपास १५ ,१५ लाख रुपये घेतले आल्याचा यंत्रणांना संशय आहे. मात्र आता सीबीआयने तिच्या घरी धाड टाकली आणि सगळ्या कागदपत्रांची चौकशी केली आहे. तिच्या आणि आरोपींमध्ये टेलिग्राम चॅनलवरून संपर्क असल्याचं निष्पन्न झालं आहे.

  • CBIने पुण्यातील मनीषा वाघमारेला ताब्यात घेऊन अटक केली.
  • टेलिग्राम चॅनलद्वारे विद्यार्थ्यांना पेपरफुटी आरोपींपर्यंत जोडल्याचा आरोप आहे.
  • पी. व्ही. कुलकर्णीवर विशेष वर्ग घेऊन NEET पेपर फुटवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पेपर फुटी प्प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तो म्हणजे पी वी कुलकर्णी त्याला आज विशेष कोर्टात हजर केल जाणार आहे. दिल्लतील विशेष न्यायालयात करणार हजर करणार आहेत. त्याच्यावर एक मोठा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या या सगळ्या प्रकारात मुख्य आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलकर्णीला सीबीआय कोठडी मिळण्याची शक्यता आहे. त्याची सीबीआय कडून कसून चौकशी करण्यात आली आणि त्या नंतर ताब्यात घेण्यात आल आहे. सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात कुलकर्णी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोपावरून केली अटक केली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग घेत नीट परीक्षा पेपर फोडले असल्याचा कुलकर्णींवर आरोप आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button