सुजात आंबेडकरांची जहरी टीका,जसे मोदींचे एपस्टीनशी संबंध तसेच महाराष्ट्र भाजपचे खरातशी संबंध ?
सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

नाशिकमधील जेलरोड परिसरात जनसंवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
नाशिकमधील सभेत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “जसे नरेंद्र मोदींनी एपस्टीन, ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी संबंध ठेवले. तसेच महाराष्ट्र भाजपाने नाशिकमध्ये एपस्टीनसारखा खरात पाळण्याचे काम केले. अमेरिकेत ट्रम्पने जेफ्री एपस्टीनला वाचवण्याचे काम केले आणि महाराष्ट्रातल्या भाजपाने खरातला वाचवण्याचे काम केले. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदापासून हटवणे आणि एपस्टीन केस मधील सगळ्यांना अमेरिकेत आणि इजरायल मध्ये आपल्या हातात नसले तरी, खरात प्रकरणात जे पक्ष, जे नेते लिप्त होते ज्यांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. त्यांना नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही अशी खुणगाठ बांधली पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत ते पुढले म्हणाले, “या देशाला बदल हवा होता म्हणून नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री केले. तेव्हापासून आतापर्यंत मोदींनी फक्त फेकण्याचे काम केले. आज स्कॉलरशिप्स धोक्यात आहे, आज रुपयाचा दर पडताना दिसतोय, डिझेल पेट्रोल महाग होत चाललंय, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाहीये. आणि आपले पंतप्रधान आपल्याला बसून सांगतात कि सोनं नका घेऊ, इंधन नका वापरू, जास्त प्रवास नका करू… पण यांच्या मित्राचा फोन आला कि हे विमान काढून इस्राएलला जातात. दुसऱ्या मित्राचा फोन आला कि विमान काढून अमेरिकेला जातात. नरेंद्र मोदी असे पंतप्रधान आहेत जे कॉम्प्रोमाइज्ड झाले आहेत. नरेंद्र मोदींची जी फाईल आहे त्याची कॉपी एप्सटिन फाईलमध्ये आहे. आणि त्या एप्सटिन फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे.”
- सुजात आंबेडकर यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरातप्रकरणी भाजपवर जोरदार टीका
- एप्सटिन फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे – सुजात आंबेडकर
- “स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो, हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकला गेला आहे,” प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका
“नरेंद्र मोदी यांचे एपस्टीनशी संबंध आहेत. ज्या फाईलमध्ये एप्सटिनच्या सगळ्या काळ्या करतुती लिहून ठेवल्या आहेत त्याच एप्सटिन फाईलमध्ये मोदींच नाव आहे. ज्या माणसाचे संबंध एका बलात्काऱ्याशी आहेत त्या माणसाला आपण एक चांगला पंतप्रधान मानणार का? जर एप्सटिन फाईल अमेरीकेकडे आहे तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या हातात मोदींचा नाडा नाही आहे का? आणि असं असेल तर अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प मोदींना हवं तसं नाचवू नाही शकत का? म्हणूनच आता जो भारत आणि अमेरिकेत करार झाला त्या करारात मोदींनी भारत देश अमेरिकेला विकलेला आहे. आणि म्हणून जो माणूस अमेरिका आणि ट्रम्प आपली पोलखोल करेल म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकला गेला आहे. कोणत्याही परिस्थितीत या पंतप्रधानाला बदलायची गरज आहे,” अश्या शब्दात त्यांनी सडकून टीका केली.



