maharastraमुंबई

मराठी नववर्षानिमित्त मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला…

एक अभ्यासू नेता ,तसेच सतत मराठी भाषा, मराठी माणसं , आणि महाराष्ट्रात योग्य वाटचाल कशी निर्माण करता येईल या साठी सातत्याने पाठपुरावे करणारे नेतृत्व अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

तब्बल २० वर्षांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच दिवशी १९ मार्च २००६ ला मनसे स्थापन केल्यानंतरची पहिली सभा गाजवली ती हीच !!आज पुन्हा १९ मार्च २०२६ ला गुढीपाडवा मेळाव्यात दरवर्षी प्रमाणे यंदा हि राजसाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ,आज त्यांनी एक नवीन प्रेरणा नवीन संकल्प नवे विचार आपल्या मनसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेला दिले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

१.  मार्च २००६ रोजी पक्षाची स्थापना झाली त्यानंतर १९ मार्च २००६ रोजी पक्षाची पहिली सभा इथेच शिवतीर्थावर पार पडली. आणि २० वर्षानंतर १९ मार्चला गुढीपाडवा यावा याला मी शुभसंकेत समजतो.

२. निवडणुका वगैरे बाजूला राहिलं पण एक लक्षात ठेवा आपण जे उभे आहोत ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी उभे आहोत.

३. जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता त्या इराणवर आज इतके हल्ले होतायेत. आपण त्या इराणला साथ द्यायला हवी होती. हे पंतप्रधानांकडून राहून गेलं.

४. खैमैनी गेल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी एक निषेधाचं ट्विट सुद्धा केलं नाही. जो देश काश्मीरच्या विषयावर नेहमी आपल्या बाजूने उभा राहिला, आज आपण त्याला साथ दिली नाही. याचा त्रास आपल्याला भविष्यात होणार हे निश्चित.

५. मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, भाषण करशील तेव्हा लोकांना काय देशील याचा विचार कर. त्यामुळे नेहमी मी भाषण करताना तोच विचार करतो की मला तुम्हाला काय नवीन देता येईल.

६. तुम्ही सर्वांनी पहिलं इन्स्टाग्राममधून बाहेर यायला हवं. तुम्हाला इन्स्टाग्राममध्ये सध्या गुंतवून ठेवलंय. मोबाईलमध्ये तुम्ही अडकून रहावं आणि तुम्ही सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी केलेलं हे डिझाईन आहे.

७. ११ लाख कोटींचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी हे कर्ज २ लाख कोटींचं होतं. त्यानंतर २०१४ ते २०२६ या १२ वर्षात हे कर्ज ११ लाख कोटींवर गेलं.

८. ३ वेळा आजपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. पण या देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण या महाराष्ट्रात आहे. हे इथे कोस्टल रोड बांधतात आणि आपण त्याची स्तुती करत बसतो. पण आपल्या हे लक्षात येत नाही तो रस्ता मराठी माणसाला बाहेर जाण्यासाठी आणि इतरांना आत येण्यासाठी झालाय.

९. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेत या जगामध्ये. तुम्हाला जग म्हणतं तुम्ही मराठी माणूस आहात. म्हणजे तुम्ही कोण आहात? तुम्ही मराठी भाषा बोलता म्हणून तुम्ही मराठी आहात.

१०.दक्षिणेतील राज्ये, गुजरात यांसारखी राज्ये आपलं अस्तित्व टिकवून आहेत. आणि आपल्याकडचे आमदार-खासदार बघा फक्त कंत्राटदार आणि पैसे यातच गुंतलेत.

११. ग्रामीण भागात विकास होत नाही. ग्रामीण भागातले तरुण-तरुणी शहरात येतात. शहरं बकाल झाली आहेत. ठिकठिकाणी ड्रग्ज मिळतायेत. काय चाललंय या महाराष्ट्रात?
तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या मुला-बाळांची हमी नाही आणि आपण म्हणायचं आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो.

१२. आम्हाला कशाची काही पडलेली नाहीये, आम्ही आमची ओळख विसरून गेलो आहोत. आज महाराज असते तर विधानसभेत जाऊन कापून काढले असते.

१३. मी नेहमी सांगतो- हा महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवत आला, या हिंदप्रांताला दिशा दाखवत आला.

१४. ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या महापुरुषांना कधीही जातीच्या चष्म्यातून बघू नका. त्यांनी काय योगदान दिलं ते महत्त्वाचं आहे.

१५. मराठी माणसाच्या अंगात मराठी बाणा भिनवला तो बाळासाहेब ठाकरेंनी, देशातील हिंदूंना पहिल्यांदा हिंदू म्हणून मतदान करायला लावलं ते बाळासाहेब ठाकरेंनी

१६. भारतीय काँग्रेस पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. आरएसएसचे आजवर ६ सरसंघचालक झाले त्यातील ४ मराठी आणि आरएसएसची निर्मिती करणारे हेडगेवार हे देखील मराठीच.
१७. महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय, महाराष्ट्र जेव्हा महापुरुषांच्या प्रतिभांमध्ये अडकेल ना तेव्हा आपल्याला गतवैभव प्राप्त होईल.

१९ . आत्तापर्यंत आपल्याला ८ भारतरत्न मिळाले त्यातले ४ भारतरत्न एकट्या दापोलीमधले आहेत, पण आम्हाला त्याचा अंदाजच नाही.

२० . आम्हाला महाराष्ट्र कसा घडवायचाय याचा आमचा विचारच संपलाय. आमच्याकडे सरकारं रोज नवे कायदे करतायेत पण आम्हाला देणघेणं नाही. आम्ही गुंतलोय करमणुकीमध्ये.

२१. आपल्याला हा भविष्यातील महाराष्ट्र घडवायचाय. तो तुम्हाला आणि आम्हाला मिळून घडवायचाय. यासाठी मी आज नवीन योजना आणलीये.

२२. मी २००६ साली याच मंचावरून सांगितलं होतं मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडेन. २०१४ साली मी तो महाराष्ट्रासमोर मांडला. आज त्याला १२ वर्षं लोटली.

२३. महाराष्ट्रात नेमकं काय व्हायला हवं, ते कसं व्हायला हवं याच्याबाबत अनेक लोकांकडे योजना आहेत पण त्या मांडायच्या कोणाकडे? ही अडचण सर्वांसमोर आहे.

२४. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून मी आज maharashtra-next.in ही वेबसाईट महाराष्ट्राला अर्पण करत आहे. त्यावर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. ते आम्ही आधी तज्ज्ञांकडे आणि पुढे सरकारकडे नेऊ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button