maharastra

अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांचे हस्ते लोकार्पण…

अमरावती :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यनमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित आहेत. अमरावती विमानतळावर मुंबई ते अमरावती असे प्रवास करणारे हे प्रवासी विमान यशस्वीरित्या दाखल झाले आहे.यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थिती आहेत, यासाठी विमानतळ वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आजच संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला, यावेळी 100 पोलीस अधिकारी व 300 पोलीस कर्मचारी असा 400 पोलिसाचा चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर 3 हजार लोक बसू शकेल असा भव्य असा मंडप तयार करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button