गणेश नाईक यांचे वक्तव्य, योग्य नियोजन, शिस्तबद्ध कारभारामुळेच करवाढ नाही…
नवी मुंबई हे डेटासेंटर चे प्रमुख केन्द्र बिंदू बनत असून औद्योगिक क्षेत्रातील महसुलामुळे नागरीवस्ती वरील कराचा बोजा वाढू देणार नसल्याचे ,गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई येथे नुकत्याच एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांची मुलाखत घेण्यात आली .या मुलाखतीत नाईक यांना नवी मुंबईत करवाढ होत नाही मग कारभार कसा चालतो , असा प्रश्न विचारण्यात आला असता गणेश नाईक यांनी स्पष्ट उत्तर दिले .वनमंत्री गणेश नाईक म्हणाले कि जेव्हा २000 साली निवडणूक सुरु होणार होती ,त्या वेळी मी नवी मुंबईकरांना शब्द दिला होता की,२० वर्ष घरपट्टी -पाणीपट्टी वाढू देणार नाही .आणि त्याच नुसार वीस वर्षात करवाढ झाली नाही आहे ,जेव्हा भारताचे पंतप्रधान मोदी यांनी डेटा सेंटर या बाबत जेव्हा माहिती घेतली ,तेव्हा त्यांना लक्षात आले कि भारताचा डेटा होण्कोंग,चीन,सिंगापूर मध्ये आहे .येत्या ५ वर्षात संपूर्ण डेटा हा भारतात आला पाहिजे ,या कामासाठी चेन्नई व नवी मुंबई या दोन शहराची निवड करण्यात आली .नवी मुंबई तसेच चेन्नई मध्ये ५ लाखांन पेक्षा अधिक डेटा सेंटर आहेत ,चेन्नई ची स्पीड हि ५० तर नवी मुंबई ची स्पीड हि ७० च्या आसपास आहे .



