पुणे

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक; २२ दुचाकी जप्त

पुणे :   पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. १५ लाख ४० हजारांच्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ओंकार दिलीप गवारे आणि महेश महादेव दनाने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं देखील समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून शहरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरी करणारे आरोपी गवारे आणि दनाने हे थेरगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांना सापळा रचून वाकड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी २२ गुन्हे केल्याचं कबूल केले. आरोपीकडून १५ लाख ४० हजारांच्या एकूण २२ दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, गुन्हे पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, चव्हाण, बीभीषण, इनामदार, काळे, गिरे, गवारी, साबळे, खेतल, अतिक शेख, शिमोन चांदेकर, तात्या शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button