पुणे

बॅगेत आणलं घबाड, झडती घेताच पोलीस चक्रावले; विदर्भातील विद्यार्थ्यांचा पुण्यात कारनामा

पुणे : विदर्भातून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांकडून शहरात गांजाविक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे २० लाख रुपयांचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या तरुणांनी गडचिरोली आणि भंडारा येथून ट्रॅव्हल बॅगेतून गांजाविक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातून गांजा घेऊन शहरात विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नगर रस्ता भागात पकडले. त्यांच्याकडून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचा ५५ किलो गांजा, तीन मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राम बैस (वय २०, रा. रामपुरी वॉर्ड, गडचिरोली), ऋतिक टेंभुर्णे (वय २१, रा. गौराळा, ता. लाखांदूर, जि. भंडारा), निकेश अनोले (वय २२, रा. कस्तुरबा वॉर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अमली पदार्थविरोधी पथक नगर रस्त्यावरील खराडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी तिघे जण गडचिरोलीतून गांजा घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे यांना मिळाली. खराडी बाह्यवळण मार्ग परिसरात पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button