बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात, लँडिंगदरम्यान जमिनीवर कोसळले विमान…
लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे.

बारामती :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे अपघाती निधन झाले आहे. आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यानअजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. आज सकाळी लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.अपघाताबाबत माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामन दल आणि कार्यकर्त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच विमान उपस्थित असलेल्या इतर 5 जणांचा देखील मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ दिल्ली रवाना झाले. तसेच अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणातच जमिवीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांचा आज अपघातात मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
“राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. हा निव्वळ अपघात आहे, राजकारण नाही. यात राजकारण आणू नये, या घटनेत कोणतेही षडयंत्र नाही, ” अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी दिली आहे. माध्यमांना प्रतिक्रीया देताना शरद पवार यांना अश्रू अनावर झाले होते.



