maharastra

पोलिसांची कडक अ‍ॅक्शन, २८ दिवसांत हजारो निष्काळजी वाहनचालकांवर कारवाई,वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन!

पोलिसांनी रस्त्यावर चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या ३,६९८ चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून अंदाजे ५५,४७,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पोलिसांनी रस्त्यावर चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या ३,६९८ चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून अंदाजे ५५,४७,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या ४७,४५९ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर ४,६५,५९,००० रुपयांचा दंड आकारला आहे. नो-एंट्री झोनचे उल्लंघन करणाऱ्या २२,६५० चालकांना २,७०,३७,५०० रुपयांचादंड ठोठावून बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात आली.

पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे हे केवळ वाहतुकीचे उल्लंथन नसून, एक गंभीर गुन्हा आहे. ही विशेष मोहीम औपचारिकपणे संपली असली तरी, मुंबईच्या रस्त्यांवरील मोहीम सुरूच राहील. विशेष मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी प्रामुख्याने तीन प्रमुख उल्लंघनांवर लक्ष केंद्रित केले. ज्यामुळे केवळ वाहतूककोंडीच होत नाही, तर ते जीवघेणेही ठरते. यामध्ये चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे आणि नो-एंट्री झोनचे उल्लंघन यांचा समावेश होता.वाहतूक पोलिसांच्या मते, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे हे केवळ एक साधे उल्लंघन नसून, रस्त्यावरील इतर वापरकत्र्त्यांचा जीव धोक्यात घालणारा एक गंभीर गुन्हा आहे. याला आळा घालण्यासाठी यावेळी विक्रमी कारवाई करण्यात आली आहे.वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. एकूण ४७,४५९ चालकांना पकडण्यात आले आणि त्याच्याकडून अंदाजे ४.६५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या २२,६५० चालकांवर प्रशासनाने २.७० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला.चुकीच्या दिशेने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ३.६९८ चालकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून एकूण ५५.४७ लाख दंड वसूल केला आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनियंत्रित वाहतूक आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. १२ मार्च ते ८ एप्रिल या २८ दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबले आणि नियम मोडणाऱ्यांवर व्यापक कारवाई केली. रस्त्यांवर शिस्त राखणे आणि सुरक्षिततेची मानके सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button