अशोक खरात नावाचा भस्मासूर कोणी पोसला, सुषमा अंधारे ?
'सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित' असे लिहीले असून, त्याठिकाणी कॅबिनेट मंत्री आणि रुपाली चाकणकर यांचा खरातच्या उपस्थिती सत्कार होताना दिसत आहे. यावरही अंधारेंनी आक्षेप घेतली आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि संगिता तिवारी यांनी आज नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.नाशिक पोलिस आयुक्तांशी भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि संगिता तिवारी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुषमा अंधारेंनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीचे आणि बैठकांचे काही फोटो माध्यमांना दाखवले, याशिवाय भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचेदेखील खरातसोबतचे फोटो त्यांनी सार्वजनिकरित्या दाखवले. यावेळी अंधारेंनी गंभीर आरोप केले आहेत. ” नाशिकमध्ये अशोक खरात नावाचा हा भस्मासूर कोणी पोसला? त्याला पैसा कोणी पुरवला?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले.सुषमा अंधारे यांनी, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर MIDC संबंधित एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील फोटो दाखवत शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध?आणि रुपाली चाकणकर तिथे काय करत होत्या? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. फोटोमधील बॅनरवर ‘सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित’ असे लिहीले असून, त्याठिकाणी कॅबिनेट मंत्री आणि रुपाली चाकणकर यांचा खरातच्या उपस्थिती सत्कार होताना दिसत आहे. यावरही अंधारेंनी आक्षेप घेतली आहे.
पण मी खरातला केवळ सामाजिक उपक्रमांमंध्येच भेटत होते, असे स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिले होते. पण हा जर सामाजिक उपक्रम होता तर तिथे MIDCचा पूर्ण स्टाफ का होता.असा सवाल उपस्थित केला. तसेच, खरात आणि चाकणकर यांच्यात कोणते संबंध होते, याची पूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई असताना मिरगावच्या ग्रामसभेने एक ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार अशोक खरातच्या ‘शिविका ट्रस्ट’ला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. “पिण्याचे पाणी देणे ही माणुसकी आहे,” या भावनेतून हा निर्णय झाल्याचे सांगितले जात असले तरी, यामागे कोणाचे राजकीय वजन होते, हे आता उघड होत आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. मंत्री केसरकर आणि चाकणकर याचे फोन रेकॉर्ड तपासण्याची मागणी करणार आहे. तसेच त्यांचे बँक खातेही चेक करण्याची मागणी करणार आहे. तसेच, सुनील तटकरे यांच्यासोबत अनेक व्यवहारांमध्ये सामील असलेले चौधरी, रुपाली चाकणकर यांच्योबत अशा व्यवहारांमध्ये को कोण सोबत आहे. साडेचारशे पाचशे कोटीचा प्रोजेक्टसाठी येवढी ताकद कुठून येते, असा सवालही अंधारेंनी विचारला आहे.



